1880 पासूनचा तुमच्या जमिनीचा सातबारा आता मोबाइलवर

पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता महाराष्ट्र सरकारने एक ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच ७/१२ उतारा सहज पाहू शकता.
लाडकी बहीण योजना: ऑक्टोबर चे १५०० रूपये मिळण्यापूर्वी १ नवीन अट लागू; निर्णय पहा Ladki Bahin Yojana New Rules
मोबाईलवर ७/१२ उतारा पाहणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील इंटरनेट ब्राउझरमध्ये “bhulekh.mahabhumi.gov.in” ही सरकारी वेबसाइट उघडा. वेबसाइट उघडल्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव यांची नावे नीट निवडा. मग तुम्हाला तुमचा ७/१२ उतारा शोधण्यासाठी काही पर्याय दिसतील. तुम्ही सर्वे नंबर किंवा गट क्रमांक टाकून शोधू शकता. तुम्हाला खातेदाराचे नाव माहिती असल्यास नाव टाकूनही शोधू शकता. खाते क्रमांक माहित असल्यास तो टाकूनही उतारा मिळतो.
तुम्ही ज्या पर्यायाने शोधणार आहात त्यातील माहिती नीट भरा आणि ‘शोधा’ या बटणावर क्लिक करा. माहिती बरोबर असेल तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमचा ७/१२ उतारा दिसेल. काही वेळा स्क्रीनवर दिसणारा ‘कॅप्चा’ कोड टाकावा लागतो. त्यानंतर तुम्ही ७/१२ उतारा तुमच्या मोबाईलमध्ये PDF म्हणून सेव्ह करू शकता.
ऑनलाइन उतारा पाहिल्याने तुमचा खूप वेळ वाचतो. यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसते. ही सेवा दिवसाचे २४ तास उपलब्ध असते. त्यामुळे कुठेही, कधीही तुम्ही तुमची जमीन नोंद पाहू शकता. वेबसाइटवरील माहिती नेहमी अद्ययावत असते, त्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी असते. मोबाईलवर सोप्या पद्धतीने उतारा पाहता येत असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.old land record



