ladki bahin instalment list:लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहत असलेल्या लाखो महिलांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याचे ₹1500 कधी मिळणार याबद्दल सगळ्यांना काळजी वाटत होती. त्यातच राज्यात निवडणुका लागल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे काही महिलांना वाटले की आता हप्ता थांबेल का?
फक्त पात्र महिलांनाच मिळणार ₹3,000रुपये

येथे पहा यादी
सरकारने आधीच सांगितले आहे की आचारसंहिता लागू झाली तरी लाडकी बहीण योजनेचा पैसा महिलांना दिला जाईल. म्हणजे पैसे देण्यात काही अडथळा नाही. पण नोव्हेंबर सुरू होऊन १० दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला असूनही अजून सरकारकडून अधिकृतपणे कोणतीही तारीख सांगितलेली नाही.ladki bahin instalment list
काही लोक म्हणत आहेत की पुढे जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सरकार पैसे देऊ शकते. म्हणून नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल याबद्दल दोन शक्यता सांगितल्या जात आहेत. पहिली म्हणजे २५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पैशे खात्यात येऊ शकतात. आणि जर नोव्हेंबरमध्ये हप्ता आला नाही, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ७ डिसेंबरदरम्यान पैसे येण्याची जास्त शक्यता आहे.
पण हप्ता कधीही मिळो, त्यापूर्वी एक खूप महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे. ते म्हणजे e-KYC पूर्ण करणे. सरकारने e-KYC करणे सर्व महिलांसाठी अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर आहे. एकूण दीड कोटी लाभार्थ्यांपैकी फक्त ८० लाख महिलांनीच KYC केले आहे. म्हणजे अजून खूप मोठ्या संख्येने महिलांनी KYC केलेले नाही.
जर एखाद्या महिलेनं १८ नोव्हेंबरपर्यंत e-KYC केली नाही, तर तिला पुढील महिन्यापासून योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे कोणाचीही KYC अपूर्ण असेल तर तिने लगेच ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन KYC पूर्ण करावी. KYC पूर्ण झाल्यावरच तुमचे खाते सक्रिय राहील आणि आचारसंहिता असली तरीही हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.



