शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी सर्वात मोठी खुशखबर, सरकारनं थेट घेतला मोठा निर्णय; नेमकं काय ठरलं? Good News for Farmers

Good News for Farmers

Good News for Farmers : राज्यातील शेतकर्‍यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्जाविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. अशातच आता राज्यातील शेतकर्‍यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्जाविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

“या” तारखेला होणार शेतकरी कर्जमाफी…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा । Farmer loan waiver 

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जाची वसूली न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना यंदा कर्ज भरावे लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

पीएम किसान योजनेतून 19 लाख शेतकरी वगळले, नवीन लिस्ट जारी । PM Kisan Yojana 

जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश

समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कर्ज भरावे लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाला लाभ मिळणार आहे.

30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार

काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने त्यांच्याशी चर्चा करून 30 जून 2026 ची कर्जमाफीसाठी डेडलाईन देण्यात आली आहे. याचा अर्थ 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन थांबवले होते. बच्चू कडू यांच्या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी नेते सहभागी झाले होते, तसेच हजारोंच्या संख्येने शेतकरीही सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.Good News for Farmers

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top