घरबसल्या असा करा आताच अर्ज

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे जीवन थोडे सोपे करणे. कारण हे कामगार कमी पगारात, उन्हात आणि पावसात खूप मेहनत करतात. म्हणून सरकारने त्यांना मदत म्हणून ही योजना आणली आहे.
1880 पासूनचा तुमच्या जमिनीचा सातबारा आता मोबाइलवर, फक्त 1 क्लिकमध्ये पहा संपूर्ण माहिती old land record
ही योजना फक्त त्या कामगारांसाठी आहे ज्यांचं नाव अधिकृतपणे नोंदलेलं आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन कार्ड सध्या चालू आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. अर्जदार महाराष्ट्रात किमान १५ वर्षांपासून राहत असावा. तसेच त्याने मागील १२ महिन्यांपैकी किमान ९० दिवस बांधकामाचं काम केलं असावं. आणि त्याचं नाव मंडळात नोंदलेलं आणि सक्रिय असावं.
भांडी संचामध्ये मिळणाऱ्या वस्तूंमध्ये — ४ ताट, ८ वाट्या, ४ ग्लास, झाकणासह १ पातेले, १ कढई, १ पाच लिटरचा प्रेशर कुकर, १ परात, ३ वेगवेगळे डबे, १ मसाला डब्बा, १ पाण्याचा जग, आणि भात-वारण वाढण्यासाठी मोठे चमचे — अशा एकूण ३० वस्तू असतील.
अर्ज करण्यासाठी कामगारांनी हमीपत्र म्हणजेच फॉर्म भरावा लागतो. या फॉर्ममध्ये तुमचा नोंदणी क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची नावे आणि नाते, तसेच भांडी संचाची माहिती भरावी लागते.
भांडी कीट मिळाल्यावर त्यातील वस्तू नीट तपासून घ्याव्यात आणि सगळं ठीक असल्याची खात्री करून मगच पोचपावती द्यावी लागते. ही भांडी कीट जिल्हा कार्यालयातून ठराविक वेळेत दिली जाते.bandhkam kamgar yojana
या योजनेमुळे कामगारांना स्वयंपाकासाठी स्वतःची भांडी मिळतील, त्यामुळे त्यांना जेवण बनवणं सोपं होईल आणि बाहेरचं खाणं कमी होईल. त्यामुळे त्यांचा खर्चही वाचेल. सरकारची ही योजना म्हणजे बांधकाम कामगारांसाठी खरोखरच एक मोठी आणि उपयोगी मदत आहे.



